सांगली (प्रतिनिधी) : सध्या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक पैशांचा वापर जपून करत असलेले आपल्याला दिसून येत आहेत. परंन्तु सांगली मध्ये एखादा खजिना सापडावा अन् आपलं नशीब चमकावं असचं काहीसं झालेलं पहायला मिळालयं. सांगली येथील एका ओढ्यामधून 500 रूपयांच्या नोटा वाहून आल्या आहेत. या नोटा गोळा करण्यासाठी तेथील स्थानिक नागरिकांची तुफान गर्दी झालेली पहायला मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीतील आटपाडीमधील ओढयाला नोटांचा हा पूर आलेला असल्याची बातमी वाऱ्याच्या झुळुकीप्रमाणे काही क्षणातचं सगळीकडे पसरली. गावातील अंबाबाई ओढयातील वाहून आलेल्या नोटा गोळा करण्यासाठी स्थानिक चक्का ओढयात उतरले. शनिवारी या ठिकाणी आठवडा बाजार भरतो. याचदरम्यान, वाहून आलेल्या नोटांकडे लक्ष गेल्याने स्थानिक नागरिकांनी हातचे काम सोडून नोटा करण्याकडे भर दिला. रहदारीचा रस्ता असल्याने गाडीवरून उतरूनही काहींनी नोटा गोळा केल्या.
ओढयातून वाहून आलेली रक्कम ही जवळपास 2 ते अडीच लाख इतकी होती. या घटनेची माहिती आटपाडी पोलिसांना समजताच क्षणी त्यांनी घटना स्थळी पोहोचेपर्यंत अनेक स्थानिक नागरिक नोटा गोळा करून तेथून निघून गेले होते. ओढयातील नोटा कोठून आल्या..? एवढया जास्त प्रमाणात त्या ओढयामध्ये कशा आल्या.? या नोटा कोणाच्या मालकीच्या आहेत..? की कोणी जाणीवपूर्वक त्या नोटा टाकल्या आहेत..? कोणता अपघात घडला असावा का..? या सर्व बाबींची माहिती अद्याप समोर आलेली नाही. सध्या स्थानिक नागरिक नोटा गोळा करत असलेले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
त्याचबरोबर, ओढयातून वाहून आलेल्या नोटा खऱ्या असल्याने जे लोक त्या नोटा घेऊन गेलेत त्यांच्याकडून त्या नोटा पोलिस परत घेतील का..? तेथे कोणताही सीसीटिव्ही कॅमेरा नसल्याने नोटा घेऊन गेलेल्या लोकांना पोलिस कसे शोधणार असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे.