सांगली (प्रतिनिधी) : सांगलीतील जामवाडी येथे राहणाऱ्या अनिकेत तुकाराम हिप्परकर (वय 22, रा. जामवाडी, सांगली) या कबड्डीपटूचा पुर्ववैमनस्यातून खून करण्यात आला. अनिकेत हा एका संस्थेत पिग्मी एजंट म्हणून काम करीत होता.
अनिकेतचा कांही महिन्यांपूर्वी हनुमान जयंतीवेळी मंडळातील काही मुलांशी वाद झाला होता. या कारणामुळे जामवाडीतील मरगुबाई मंदिराजवळ अनिकेत थांबला असता या मुलांनी पूर्वी झालेल्या वादाचा जाब विचारला. त्यावरून त्यांच्यात पुन्हा वाद झाला. हा वाद विकोपाला त्या संशयीत दोन मुलांनी अनिकेतवर दोन कोयत्यांनी सपासप वार केले.
कोयत्याचे वार वर्मी बसल्यानं अनिकेत तिथेच रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर अनिकेतला तिथेच सोडून त्या हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. याची माहिती मिळताच उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सतीश शिंदे घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून तात्काळ त्या हल्लेखोरांच्या शोधासाठी मोहीम सुरू केली आहे. यामुळे पुन्हा एकदा सांगलीत खळबळ माजली आहे.
