सांगली/प्रतिनिधी : सांगलीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा मेळावा झाला. यावेळी उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगली लोकसभेसाठी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. यावर कॉंग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त करत सांगली जागेवर कॉंग्रेसने दावा सांगत कोणत्याही परिस्थितीत ही जागा लढणार असल्याचा निर्धार केला होता.यासाठी कॉंग्रेस नेत्यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींना भेटून सांगलीची जागा कॉंग्रेसकडे राहावी यासाठी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याची विनंती केली. तर शरद पवार यांनीही ठाकरेंवर नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, सांगलीच्या जागेवरून सुरु असलेल्या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे. कारण उद्धव ठाकरे कॉंग्रेस सोबत चर्चेसाठी तयार झाले आहेत.

दरम्यान, सांगलीच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. या जागेचा काँग्रेसकडून अजूनही आग्रह केला जात आहे. पण ही जागा शिवसेना ठाकरे गटाकडे राहणार असंच दिसत असतानाच आता उद्धव ठाकरे यांनी नरमाईची भूमिका घेतल्याचं बोललं जात आहे. उद्धव ठाकरे सांगलीच्या जागेवरून काँग्रेसशी चर्चा करण्यास तयार आहेत. त्यामुळे लवकरच या जागेवर तोडगा निघेल, असं म्हटलं जात आहे.

सांगलीची जागा कॉंग्रेसकडे राहाही असा आग्रह कॉंग्रेस नेत्यांनी धरला आहे. यातच उद्धव ठाकरे सांगलीच्या जागेवरून काँग्रेसशी चर्चा करण्यास तयार आहेत. त्यामुळे लवकरच या जागेवर तोडगा निघेल, असं म्हटलं जात आहे. दिल्लीतून महाराष्ट्रात आल्यानंतर प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांसह आमदार विश्वजित कदम यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेण्याचं चर्चेत ठरल्याचं, विश्वजित कदम यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितलं.

आमदार विश्वजित कदम म्हणाले, सांगली लोकसभा मतदारसंघ लढवण्याबाबत आम्ही ठाम आहोत. काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश आहे. हे वातावरण नक्कीच काँग्रेसला ताकद देणारे आहे. आम्ही शिवसेना नेतृत्वाला आज दिल्लीत त्याची कल्पना दिली आहे. त्यांनी या जागेबाबत चर्चेची तयारी दर्शवली , हे महत्त्वाचे आहे. चर्चेतून नक्कीच मार्ग निघेल आणि महाविकास आघाडीच्या हिताचा निर्णय होईल,अशी मला खात्री आहे.