कागल (प्रतिनिधी) : सध्या राज्यात विधानसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरू आहेत. राजकीय नेते आपला उमेदवारीचा अर्ज दाखल करत आहेत. अशातच, एका पक्षाला रामराम करत दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याच्या सत्र कायम असलेलं पहायला मिळत आहे. अशातच, समरजीतसिंह घाटगे गटाला सुळकूड मध्ये जोरदार फटका बसलेला पहायला मिळत आहे.

सुळकूड शहरातील समरजीत घाटगे गटातील शाहू कृषी खरेदी विक्री संघाचे संचालक भीमगोंडा पाटील, विद्यमान सरपंच अर्चना सचिन परीट, माजी उपसरपंच शरद धोंडीराम धुळगुडे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी मंत्री मुश्रीफांच्या साक्षीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.