मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान कोणत्या तरी कारणामुळे चर्चेत येत असतोच. सलमान खानने त्यांच्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनावर राज्य निर्माण केले आहे. गेल्या काही दिवसांपासून भाईजान त्याच्या ‘सिकंदर’ चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. डिसेंबर महिना भाईजानसाठी आणि त्याच्या फॅन्ससाठी खास ठरणार आहे. येत्या 27 डिसेंबरला भाईजानचा वाढदिवस आहे.भाईजानच्या वाढदिवशी त्याच्या ह्या मोस्ट अवेटेड चित्रपटाचा टीझर रिलीज होणार आहे.
चित्रपटाची पहिली वहिली झलक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सलमान खानसाठी हा चित्रपट महत्वाचा आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. तर अभिनेत्याने चित्रपटाची शुटिंग आवरली आहे. चित्रपटाचे शुटिंग कडक सुरक्षा व्यवस्थेत पार पडली आहे. अजुन शुटिंग सुरू असून मुंबईमध्ये शुटिंग करत आहे.‘ सिकंदर’ चित्रपटाची निर्मिती सलमान खानचा खास मित्र आणि निर्माते साजिद नाडियादवाला करणार आहेत. तर चित्रपटाचं दिग्दर्शन दाक्षिणात्य दिग्दर्शक ए.आर.मुरुगदोस करत आहेत.
जानेवारीच्या शेवटी चित्रपटाचे शूट पूर्ण होणार आहे. तर ‘सिकंदर’ चित्रपटात भाईजानसोबत रश्मिका मंदानाही स्क्रिन शेअर करणार आहे. पहिल्यांदाच त्यांची जोडी मोठ्या पडद्यावर या ॲक्शनपॅक्ड चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. सलमानचे चाहते या बहुचर्चित चित्रपटासाठी प्रचंड उत्सुक आहेत. ए.आर. मुरुगदास दिग्दर्शित आणि साजिद नाडियाडवाला ग्रँडसन निर्मित ‘सिकंदर’ हा ॲक्शनपॅक्ड सिनेमा 2025 मधील ईदच्या मुहुर्तावर रिलीज होणार आहे. सलमान खान व्यतिरिक्त चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेत्री काजल अग्रवाल, शर्मन जोशी, प्रतीक बब्बर, सुनील शेट्टी, अंजनी धवन, सत्यराजदेखील अशी तगडी स्टारकास्ट दिसणार आहे. सध्या चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा करत आहेत.