मुंबई ( प्रतिनिधी ) : योगेश महाजन यांनी मराठीसह अनेक हिंदी मालिकेतून काम केलं आहे. हॉटेलच्या रूममध्ये ते मृतावस्थेत आढळल्याने अनेकांना धक्का बसला आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने योगेश महाजन यांचे निधन झाल्याचे सांगितले जात आहे.
शनिवारी हिंदी मालिकेचे शूटिंग चालू असताना त्यांना अस्वस्थ जाणवू लागले होते. डॉक्टरांकडून उपचार घेतल्यानंतर ते हॉटेलच्या रुमममध्येच थांबले. पण आज सकाळी शूटिंगसाठी का पोहोचले नाही म्हणून चौकशी करण्यात आली तेव्हा त्यांच्या निधनाची बातमी सहकलाकारांना समजली. संसाराची माया, हिरवं कुंकू,भंडारा प्रेमाचा, शिवशक्ती, अदालत, जय श्री कृष्णा अशा मालिकेतून आणि चित्रपटातून ते झळकले होते.