कोल्हापूर (प्रतिनिधी) – कोल्हापूर जिल्हा डिजिटल मीडियाच्या अध्यक्षपदी सचिन वरेकर (कोल्हापूर) विभागीय उपाध्यक्षपदी संजय मष्णू पाटील (चंदगड) कृष्णात कोरे (कागल), सरचिटणीस पदी प्रा सुरेश वडराळे (गडहिंग्लज) तर जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी प्रा.सुनील देसाई (गडहिंग्लज) यांची निवड करण्यात आली आहे.संघटनेचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे,कार्याध्यक्ष संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य कार्यकारणी सदस्य अनिल धुपदाळे यांनी नव्या कार्यकारणीची घोषणा केली.

सध्याच्या डिजिटल युगात पत्रकारिता क्षेत्रही डिजिटल झाले आहे.पत्रकारितेच्या बदलत्या स्वरूपाला अनुसरून महाराष्ट्रातील आद्य पत्रकार संघटना आणि पत्रकारांची मातृसंस्था म्हणून ओळखले जाणा-या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने संघटनेशी संलग्न संपूर्ण महाराष्ट्र आणि देशातील मराठी बहुल डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांची ‘डिजिटल मीडिया राज्य संघटना’ नुकतीच स्थापना केली आहे.अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने कोल्हापूर जिल्हा आणि तालुका शाखांच्या कार्यकारिणी काल जिल्हा आणि राज्यस्तरावरून घोषित करण्यात आल्या आहेत.

कोल्हापूर जिल्हा शाखेची संपूर्ण कार्यकारणी पुढील प्रमाणे- अध्यक्ष- सचिन वरेकर(लाइव्ह मराठी, कोल्हापूर), उपाध्यक्ष- कृष्णांत कोरे (कागल, डीबीसी लाईव्ह), प्रसिद्धीप्रमुख प्रा.सुनिल देसाई (गडहिंग्लज, सिंहवाणी), विभागीय उपाध्यक्ष- संजय मष्णू पाटील (सी एल न्यूज, चंदगड), सरचिटणीस प्रा सुरेश वडराळे (परिवर्तनाच्या दिशा, गडहिंग्लज), खजिनदार- विठ्ठल केसरकर (निपाणी, महासत्ता), संपर्कप्रमुख दत्तात्रय देशपांडे (स्वतंत्र प्रगती, गडहिंग्लज), विभागीय उपाध्यक्ष राजाराम कांबळे (शाहूवाडी लोकमत/ बी न्यूज) सदस्य- चेतन शेरेगार (सी एल न्यूज, चंदगड), रावसाहेब यादव (डीबीसी लाईव्ह, गडहिंग्लज) अशोक मोहिते (महान कार्य, गडहिंग्लज) यांची निवड झाली असून कोल्हापूर, सिंधुदुर्ग – बेळगाव जिल्हा विभागीय सचिव पदी उदयकुमार देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे.