सावरवाडी (प्रतिनिधी) : देशाचा व समाजाचा विकास साधण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर राऊंड टेबल इंडियाचे अध्यक्ष कौशल संघवी यांनी केले.

हणमंतवाडी (ता.करवीर) येथील हणमंतवाडी हायस्कूलमध्ये राऊंड टेबल इंडियाच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या वर्ग खोल्यांच्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पोतदार होते. दरम्यान मान्यवरांच्या हस्ते सहा वर्ग खोल्यांचे उद्‌घाटन करण्यात आले.

यावेळी योगेश परमार, जयेश देशपांडे, रवी डोली, उत्तम फराकटे, प्रसाद गुळवणी, शिवाजी नरके, मुख्याध्यापक के.एस. पोतदार, प्रथमेश भस्मे, महेश खडके, स्नेहा संघवी, ईशा भस्मे, विना डोली, ऋतुजा पाटील, गौरी खडके आदीसह राऊंड टेबलचे पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते. स्वागत एस. के. थोरात यांनी तर प्रास्ताविक जे.एस. पोतदार यांनी केले. एस.एस.यादव यांनी आभार मानले.