कपिलेश्वर(प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने मागासवर्गीय कक्ष सहाय्यक आयुक्त  कीर्ती नलावडेना कोल्हापूर जिल्ह्यातील रोस्टर तपासणी कॅम्प कोल्हापूर मध्ये घेण्यासंदर्भात पुणे येथे निवेदन देण्यात आले…!

यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षण संस्थेतील लोकांना रोस्टर तपासणीसाठी पुणे येथे वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्यामुळे थोडीशी जरी त्रुटी राहिली  तर पुन्हा पुढील तारखेला जाऊन रोस्टर तपासणी घ्यावी लागते त्यामुळे लोकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो जर रोस्टर कॅम्प कोल्हापूर जिल्ह्यातील मुख्याध्यापक संघामध्ये आयोजित केला तर सर्व संस्था , मुख्याध्यापक व क्लार्क यांना त्याचा फायदा होईल आणि वेळ वाचेल यासंदर्भात मुख्याध्यापक संघाच्या वतीने सर्व चर्चा करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक  संघाचे उपाध्यक्ष रवींद्र मोरे, संचालक एम जी पाटील, अशोक पाटील ,चंद्रकांत लाड , जे टी चौगुले , बाबासाहेब पाटील,या सर्वांनी सहाय्यक आयुक्त कीर्ती नलावडे यांच्याबरोबर चर्चा केली व निवेदन दिले यावेळी त्यांनी पुढील काळामध्ये कोल्हापूर जिल्हासाठी स्वंतत्र रोस्टर तपासणी कॅम्प घेण्यात येईल असे सांगितले.