मुंबई ( प्रतिनिधी ) – सध्या देशात लोकसभा रणांगण सुरु आहे. महाराष्ट्रातील पाच ही टप्प्यातील मतदान संपले असून आता निकालाकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. तरीही राजकीय नेत्यांमध्ये एकमेकांना निशाणा सांधण्याच काही थांबत नाहीयत. माजी कृषीमंत्री शरद पवार आणि सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्यात राजकीय युद्ध पुन्हा सुरू झालाय.
काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत शरद पवारांनी अण्णा हजारे यांच्यावर निशाणा साधला होता. माझ्या विरोधात ट्रकभर पुरावे असल्याचा दावा तत्कालीन उपायुक्त जे आर खैरनार आणि अण्णा हजारे यांनी केला होता.माझ्यावर आरोप करणारे खैरनार आणि हजारे व इतरांचा काय झालं? ते आज कुठे आहेत असा सवाल करत शरपावर यांनी अण्णा हजारे यांच्यावर टीकास्त्र डागले होत. या टीकेला अण्णा हजारे यांच्याकडून देखील प्रतिउत्तर देण्यात आलं होतं. हजारे म्हणाले शरद पवार यांना दहा-बारा वर्षांनी जाग आली आहे. त्यांना अचानक जाग कशी आली मला माहित नाही m त्यावेळी मी केलेला आंदोलनामुळे शरद पवार यांचे अनेक मंत्री घरी गेले होते. तसेच मी शरद पवारांचे नातेवाईक असलेले पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात ही आंदोलन केलं होतं कदाचित त्याचा त्यांना राग आला असावा म्हणून त्यांनी माझ्यावर टीका केली. असं जो प्रतिउत्तर अण्णा हजारे यांनी दिला होत. अण्णा हजारे यांच्या या प्रतिउत्तरला आमदार रोहित पवार यांनी पलटवार केला आहे
काय म्हणाले रोहित पवार ..?
अण्णा हजारे आणि शरद पवारांच्या या लढाईत रोहित पवार उतरले आहेत. ते अण्णा हजारेंवर निशाणा साधत म्हणाले ‘२०१४ पूर्वी प्रत्येक विषयावर आंदोलन करणारे, प्रतिक्रिया देणारे तथाकथित स्वयंघोषित गांधी २०१४ नंतर मात्र एवढ्या मोठ्या घडामोडी घडत असताना शांतच राहिले नाहीतर गायब झालेत. गांधीवादाचा मुखवटा लावून भावनांशी खेळणे योग्य नाही, असे म्हणत अण्णा हजारे यांच्यावर निशाणा साधला आहे.