मुंबई : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये तीन सामन्यांची टेस्ट सीरिज सुरु आहे.तर शनिवारी पुण्यात झालेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला असून न्यूझीलंडने 113 धावांनी सामना जिंकला असून यासह सीरिजमध्ये 2-0 ने आघाडी घेतलेली आहे.टीम इंडियाने तब्बल 12 वर्षांनी भारतात टेस्ट सीरिज गमावली असून या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा फार नाराज झाला आहे.तर विराट कोहली देखील पुणे टेस्टमध्ये फलंदाजीत कमाल दाखवू शकला नाही.आता तिसऱ्या टेस्टपूर्वी हे दोन्ही अनुभवी फलंदाजांनी ब्रेक घेतला आहेत.

भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली आणि केएल राहुल हे तिघे आपल्या कुटुंबासोबत शनिवारी सामना झाल्यावर मुंबईला रवाना झाले आहेत.तर टीम इंडियाचे उर्वरित खेळाडू आणि स्पोर्ट स्टाफ रविवारी मुंबईला परतणार आहे. 1 नोव्हेंबर पासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तिसरा आणि शेवटचा टेस्ट सामना खेळला जाणार आहे. तिसऱ्या टेस्टच्या आधी दोन दिवस खेळाडूंना ब्रेक दिला गेला आहे. ब्रेकनंतर टीम इंडियाचे सर्व खेळाडू 30 आणि 31ऑक्टोबरला होणाऱ्या प्रॅक्टिस सेशनमध्ये सहभाग होतील.हे प्रॅक्टिस सेशन अटेंड करणं टीम इंडियाचा सर्व खेळाडूंसाठी बंधनकारक असणार आहे.