मुंबई(प्रतिनिधी):बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्यात सीझनची पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली होती.बॉडी बिल्डर संग्राम चौगुले बिग बॉस मराठी सीझन 5 मधील पहिला वाईल्ड कार्ड ठरला.
संग्राम चौगुले घरात शिरताच नवा राडा पाहायला मिळेल अस वाटत होत. मात्र, बिग बॉसच्या घरात एन्ट्री करताच दादागिरी करणारा संग्राम नंतर मात्र शांत दिसू लागला.त्यामुळे आज भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ संग्राम चौगुलेची शाळा घेताना दिसणार आहेत.वाईल्ड कार्ड असणारा सदस्याला बिग बॉसचा खेळ सर्व गोष्टी माहिती असतात. त्यानुसार वाइल्ड कार्ड सदस्य आपला गेम प्लॅन ठरवत असतो. पण संग्रामचा गेम प्लॅन या आठवड्यात तरी प्रेक्षकांना पाहायला मिळाला नाही म्हणून प्रेक्षक नाराज आहेत.बिग बॉस मराठी भाऊच्या धक्क्याच्या नवीन प्रोमोमध्ये रितेश भाऊ संग्राम चौगुलेचा क्लास घेताना दिसून येत आहे.
रितेश भाऊ म्हणतोय, “संग्राम तुम्ही मिस्टर युनिव्हर्स आहात. पण बिग बॉसच्या घरात तुम्ही मिस्टर इंडिया आहात. तुम्ही दिसतच नाही आहात. महाराष्ट्राची अपेक्षा होती की, या घरात एक वाइल्ड कार्ड यावा, त्याने एक अख्खा गेम पलटवून टाकावा. बिग बॉस मराठीच्या घरात तुम्ही वाइल्ड कार्ड म्हणून आला नाहीत तर माइल्ड कार्ड म्हणून आलेले आहात”. बिग बॉस मराठी भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊच्या क्लासनंतर संग्राम चौगुले कसा खेळ खेळणार? संग्रामच्या नव्या गेम प्लॅनचा निक्की आणि अरबाजवर काय परिणाम होईल? असे प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत अशा सर्व प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना आगामी आठवड्यात मिळतील.