कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रिशभ डेव्हलपर्सच्या वतीने जयेशभाई ओसवाल, शैलेश ओसवाल, वैभव ओसवाल यांनी दोन स्वयंमचलित सँनिटायझर मशीन आणि पंचवीस लिटर सँनिटायझर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे सुपूर्द केले आहे. यामधील एक मशीन घाटीदरवाजा येथे तर दुसरे ऑफीसमध्ये बसवण्यात आले.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते आणि जयेशभाई ओसवाल, समिती सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत मशीन पुजन करण्यात आले.

यावेळी मंदिर व्यवस्थापक धनाजी जाधव आणइ कर्मचारी उपस्थित होते.