निपाणी (प्रतिनिधी) : कार्तिकी एकादशी सगळीकडे उत्साहात पार पडली. तर नांगनूर ता.निपाणी येथील रेणुका मंदिर येथे कार्तिकी एकादशी निमित्त शुक्रवारी सायंकाळी रेणुका मंदिर परिसरात भाविक भक्तांनी रांगोळी काडून संपूर्ण परिसरात दिवे लावून थेथील परिसर उजळून निघाला .
यावेळी रेणुका यात्रा पंच मंडळी यांच्या मार्फत सायंकाळी रेणुका मातेची आरती करून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तर महाप्रसादाचा लाभ भाविक भक्तांनी घेतला या कार्यक्रमासाठी रेणुका पंच कमिटी महादेव पाटील,बाळू चेंडके,सदाशिव चेंडके,दयानंद कोगले,कांचन हजारे,मेघा चेंडके,बाळासो कांबळे,संगीता कांबळे आणि गावातील नागरिक आणि भाविक उपस्थित होते.