कोल्हापूर ( प्रतिनिधी ) – भाविकांच्या प्रचंड गर्दीमध्ये सध्या साडेतीन शक्तीपीठाच्या अंबाबाई मंदिर परिसरात नवरात्री उत्सवात मोठी गर्दी होत आहे.मंदिर आणि परिसरात विविध सेवाभावी संस्था यांनी आपली सेवा कार्य उभारले असून त्याचा परगावहून आलेल्या भाविकांना मोठा लाभ होत आहे श्री पूजक संघाच्या वतीने विद्यापीठ हायस्कूल समोर व्हाईट आर्मी सलग नऊ दिवस वैद्यकीय पथक कार्यरत आहे. तसेच या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
रामचंद्र ठाणेकर यांच्यासह व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे डॉ . गिरीश कोरे डॉ. संदीप पाटील यांच्यासह जी 100 हून अधिक कार्यकर्त्यांची टीम या ठिकाणी 24 तास कार्यरत आहे. तसेच राजवाडा पोलीस ठाण्याच्या वतीने विद्यापीठ हायस्कूल समोर माहिती संदर्भ कक्ष कार्यरत आहे. या ठिकाणी हरवलेल्या नातेवाईक तसेच आपत्कालीन सेवा देण्यासाठी पोलिसांकडून स्पीकरवर माहिती दिली जात. अनिरुद्ध बापू सेवा संस्थेच्या भाविकांच्या वतीने मंदिर परिसरात मुखदर्शनासाठी तसेच विद्यापीठ परिसरात वाढलेल्या रांगा रोप लावून भाविकांना त्या ठिकाणी मार्गदर्शन केले जात आहे.
यास ज्योतिबा रोड फुल विक्रेतेच्या वतीने रोज रात्री रात्री निघणाऱ्या अंबाबाईच्या पालखी विविध आकर्षक फुलांनी सजवला जात आहे. मंदिर परिसरात आणि गाभाऱ्यात हिडदुगी परिवाराच्या वतीने दोन लाख फुलांची आकर्षक पुष्परचना करण्यात आली होती तसेच गेले बारा वर्षे अधिक काळ रोहन व्हिडिओ आणि त्यांचे सर्व सहकारी देवदत्त कांबळे, आंबले आणि त्यांच्या सहकार्य समावेत पालखी उत्सव तसेच थेट प्रक्षेपण यासाठी सेवा देत आहे.
यंदा प्रथमच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने मंदिराच्या चारी भागासह बिंदू चौक आणि त्याचबरोबर शिवाजी पेठेतील उभा मारुती चौक आणि मध्यवर्ती बस स्थानक समोर मोठ्या एलईडी स्क्रीन लावून महालक्ष्मी देवीचे अविरत दर्शन आणि विविध असणारे धार्मिक विधी या ठिकाणी दाखवले जात आहेत.