मुंबई – भारताच्या उद्योग क्षेत्रातील बापमाणूस, प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं आहे. रतन टाटा यांना रविवारी (6 ऑक्टोबर) रात्री उशिरा साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रतन टाटा यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यांनतर तिसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांची प्रकृती जास्त खालावल्याची माहिती समोर आली. प्रकृती खालावल्यामुळे रतन टाटा यांना ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूत दाखल करण्यात आले परंतु तिथे त्यांची प्राणज्योत मालवली. काल त्यांचे पूर्ण राज्य सन्मानाने अंतिम निरोप करण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 4 वाजता वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला .

रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा इंडस्ट्री कोण सांभाळणार..? त्यांचा उत्तराधिकारी कोण होणार याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिले आहे. अशातच एक महत्वाची बातमी समोर आली आहे. लवकरचं रतन टाटा यांच्या उत्तराधिकारीची घोषणा होऊ शकते. टाटा ट्रस्टने याविषयीची एक बैठक बोलावली आहे. त्यामध्ये रतन टाटा यांचा उत्तराधिकारी निवडल्या जाऊ शकतो. रतन टाटा यांचे बंधू नोएल टाटा यांची निवड होण्याची सर्वाधिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. नोएल हे पूर्वीच सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि टाटा ट्रस्टमध्ये विश्वस्त आहेत. या ट्रस्टची टाटा समूहाच्या टाटा सन्समध्ये 66% हिस्सेदारी आहे. टाटा ट्रस्टने अजून या विषयी कोणतीही टिप्पणी केलेली नाही.

पारसी समाजाची इच्छा काय?

पारसी समाजाने टाटा अडनाव असलेली व्यक्ती टाटा समूहाची उत्तराधिकारी असावी यावर शिक्कामोर्तब केले होते. ते नोएल टाटा यांच्या नावावर सहमत होते. सध्या टाटा ट्रस्टमध्ये दोन जण मुख्य आहेत. यामध्ये टीव्हीएस के वेणु श्रीनिवासन आणि माजी संरक्षण सचिव विजय सिंह यांचा समावेश आहे. हे दोघेही 2018 पासून उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. नोएल यांची कार्यशैली ही रतन टाटा यांच्यापेक्षा अगदी वेगळी मानण्यात येते. प्रसिद्धीपासून दूर राहून काम करणे त्यांना आवडते.