मुंबई ( प्रतिनिधी ) : छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘छावा’ ऐतिहासिक सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता विकी कौशल कसा दिसेल, याची झलक काही फोटोंमधून नुकतीच पाहायला मिळाली. या चित्रपटात महाराणी येसूबाईंच्या भूमिकेसाठी अनेक अभिनेत्रींची नावे समोर येत होती. आता अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचा महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतील लुक देखील समोर आलाय.

रश्मिका या सिनेमात महाराणी येसूबाईंची भूमिका साकारणार आहे. भरजरी पैठणी साडी, मराठमोळे दागिने आणि कपाळावर लाल कुंकू अशा मराठमोळ्या लुकमध्ये रश्मिका शोभून दिसतेय. तिचा हा लुक लक्षवेधी ठरत आहे. रश्मिकाचे दोन फोटो समोर आले आहेत. एका फोटोत तिच्या चेहऱ्यावर हास्य आहे, तर दुसऱ्या फोटोत गंभीर भाव आहेत. काही जणांना हा लुक आवडला आहे, तर काहींना रश्मिकाची निवड योग्य वाटत नाहीये.