मुंबई : गेल्या वर्षी रणबीरच्या ‘अॅनिमल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोटींची कमाई करत धुमाकूळ घातला होता. आता तो नितेश तिवारीच्या ‘रामायण’ या ऐतिहासिक चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात रणबीरसोबत अभिनेत्री साई पल्लवी ‘माता सीते’च्या भूमिकेत दिसणार आहे. साई पल्लवी या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. चित्रपटात अनेक कलाकार आहेत यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
आता रामायणावर पहिल्यांदाचं वक्त्यव्य केलं आहे.. “मी सध्या एका चित्रपटात काम करत आहे. ज्याचे नाव रामायण आहे. ही भारताची महान कथा आहे. नमित मल्होत्रा हा चित्रपट बनवत आहे. यात जगभरातील कलाकार, निर्माते आणि क्रू मेंबर्सचा समावेश आहे. ते दोन भागात बनवले जात आहे. ही भगवान राम आणि रावणाची कथा आहे. मला भगवान रामाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आणि एक अभिनेता म्हणून माझ्यासाठी ही खूप रोमांचक आणि समाधान देणारी संधी आहे.”
पुढे तो म्हणाला, “नितेश तिवारी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. त्यात दोन भाग आहेत. मी पहिल्या भागाचे शूटिंग पूर्ण केले असून लवकरच दुसऱ्या भागाचे शूटिंग करणार आहे. या कथेचा एक भाग बनून रामाची भूमिका साकारणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. हे माझ्यासाठी स्वप्नासारखे आहे. हा एक असा चित्रपट आहे ज्यामध्ये सर्व काही आहे. हे आपल्याला भारतीय संस्कृतीबद्दल शिकवते. हे कुटुंब आणि पती-पत्नीबद्दल आहे. त्यामुळे मी खूप उत्साही आहे.”