मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल अखेर पार पडला. विधानसभेमध्ये महायुतीने जोरदार बाजी मारली तर महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. लोकसभा निवडणुकीच्या पराभवाचा बदला महायुतीने पुरेपूर घेतला म्हणायला काही हरकत नाही. महायुतीने २३० जागा जिंकल्या तर महाविकास आघाडीला ४६ जागा जिंकल्या आहेत. महायुतीच्या या सुनामी मध्ये महाविकास आघाडीलाच नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सुद्धा मोठा फटका बसला आहे. मनसेला एक ही जागा जिंकला आल्या नाहीत. यामुळे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे ऍक्शन मोड्वर पाहायला मिळत आहे. आता राज ठाकरे यांनी पराभूत उमेदवारांची बैठक घेतली.
काय झालं नेमकं..?
राज ठाकरे यांनी पुण्यातील पराभूत उमेदवारांची बैठक घेतली असून, आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला लागा, असे आदेश मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पराभूत उमेदवारांच्या बैठकीत दिले. विधानसभा निवडणुकीत मनसेला एकही जागा जिंकता आली नाही. राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे हे देखील माहीम विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाले. राज्यात एकही आमदार निवडून न आलेल्या राज ठाकरे यांनी पुण्यात पराभूत उमेदवारांची बैठक घेतली.
दरम्यान, मनसेच्या या बैठकीत उमेदवारांनी आपली मते मांडताना, ईव्हीएम मशिनविषयी अधिक तक्रारी केल्या. त्यासंदर्भात बहुतेक उमेदवारांचा सूर होता. तसेच प्रतिस्पर्धी उमेवारांकडून केला गेलेल्या पैशांच्या वापरापुढे निधी कमी पडल्याचे कारणही काही उमेदवारांनी सांगितले. यावेळी पक्षाचे नेते बाबू वागसकर, राजू उंबरकर, बापू धोत्रे, बाळा शेडगे आदी पदाधिकारी उपस्थित होते