मुंबई ( प्रतिनिधी ) – सध्या राज्यात विधानसभेचं रणांगण सुरु झालंय. 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून, 23 नोव्हेंबरला लगेचं निकाल लागणार आहे . त्यामुळे सध्या राज्यात विधानसभेची रेलचेल पाहायला मिळत आहे. एकीकडे विधानसभेचं राज्यात वारं वाहत आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचा बोलबाला सुरु आहे. महायुतीने अनेक योजना राबवले आहेत. जसे कि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार तर मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ या योजनेला मुलांना इंटरशिप करताना पैसे मिळणार आहेत. पण आता या योजनेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी टीका केली आहे.
काय म्हणाले राज ठाकरे..?
लोकांना फुकट देण्यास सुरुवात केल्यास लोकांना आपण लाचार करत आहोत. तरुणांना पैसे दिल्यास तो काही काम करणार नाही, ड्रग्ज तसेच अन्य काही घेण्यास सुरुवात करेल. हाताला कामं देणं हे सरकारचं काम आहे. शेतकऱ्याने सुद्धा वीज फुकट मागितलेली नाही. वीजेमध्ये सातत्य द्या, नीट द्या, थोडी कमी भावात द्या, कोणीही फुकटं काही मागितलेलं नाही. फुकट पैसा महिना, दोन महिना पुरेल, पण महाराष्ट्र दिवाळखोरीत निघून कंगाल होईल. राज्यावरील एक लाख कोटींवर कर्ज होईल, अगोदरची कर्ज फिटलेली नाहीत, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फटकारले आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते .
ते पुढे म्हणाले, लाडकी बहिणी योजनेचं काय होणार आहे यापेक्षा कोणतीच गोष्ट कोणालाही फुकट देऊ नये, कारण तुमच्याकडे कोणी काही फुकट मागत नसतं. महाराष्ट्रामधील ज्या माझ्या भगिनी आहेत त्या भगिनींना सक्षम बनवा. चांगले उद्योगधंदे आणा, चांगल्या गोष्टी करा, त्यांना सक्षम बनवा त्यांच्याकडे त्यांच्या मेहनतीचे पैसे येऊ द्या, त्यांनी कुठलं म्हटलं आहे फुकटं येऊ द्या, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाडकी बहिण योजनेवरून फटकारलं आहे.
