कपिलेश्वर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण क्षेत्रात गेले तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. राधानगरी धरण 79.57 टक्के भरले असून वीज प्रवाहातून 1,450 क्यूसेक पाण्याचा विसर्ग आहे.
आज (रविवार) दुपारी चार वाजता 73 मिलिमीटर पाऊस झाल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले. भारतीय हवामान खात्याने पुढील कांही तास कोल्हापूर जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा दिला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.