कोल्हापूर (प्रतिनिधी) : कळंबा येथील भाजी मंडईजवळ मटका घेणाऱ्या दोघांना करवीर पोलिसांनी अटक केली. संजय दशरथ कांबळे (वय ३८) आणि राजगोंडा बाबुराव पाटील (वय ५१) दोघेही रा. नरके कॉलनी अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून रोख रक्कमेसह ३६ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कळंबा (ता. करवीर) येथील भाजी मंडई परिसरात दोन इसम कल्याण मटका घेत असल्याची माहिती करवीर पोलिसांना मिळाली. त्यानुसार या ठिकाणी पोलिसांनी सायंकाळी छापा टाकला. दरम्यान, संजय कांबळे आणि राजगोंडा पाटील हे मटका घेत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून पोलिसांनी रोख रक्कम,  मोबाईल, मोटारसायकल आणि मटक्याचे साहित्य असा ३६ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात करण्यात आला आहे. मात्र, या मटका बुक्कीचा मालक जय जाधव (रा. मंगळवार पेठ) हा फरारी झाला आहे.