बारामती : सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे.आणि राजकीय नेते विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारीचा अर्ज दाखल करत आहे.तर अशातच आता लोकसभा निवडणुकीमध्ये जी चूक मी केली,ती चूक तुम्ही करायची नव्हती,असे सांगत माझ्या विरोधात साहेबांनी उमेदवार दिल्याचे म्हणतात.मग पवार साहेबांनी तात्यासाहेबांचे घर फोडले का?असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला.आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अश्रू अनावर झाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कण्हेरी या ठिकाणी झालेल्या जाहीरसभेत ते बोलताना भावूक झाले.यावेळी अजित पवार बोलत असताना म्हणाले की,माझी आई सांगत होती की,माझ्या दादाच्या विरोधात फॉर्म भरू नका.तरीदेखील ऐकलं नाही.या पद्धतीने जे काय चाललंय ते बरोबर नाही.मोठ्या व्यक्तींनी पण त्यामध्ये सांगायला पाहिजे होतं.मी जीवाला जीव देणारा माणूस आहे.मी लोकसभेत सुनेत्रा पवार यांना उभे करून मी चुकलो.आता कोण चुकले ते सांगा.
तसेच घरातलं भांडण चव्हाट्यावर यायला नको होतं,असे सांगत असताना अजित पवार यांना अश्रू अनावर झाले.पहिला फॉर्म मी भरला,ती चूक तुम्ही करायला नको होती.आम्ही बिकट परिस्थितीतून चांगली परिस्थिती निर्माण केली.यामध्ये माझ्या आईने आम्हाला आधार दिला,तर यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी घोषणा करत म्हणाले.काही महिला कार्यकर्त्यांनी अजित दादा तुम्ही रडायचं नाही,तर लढायचं,आम्ही तुमच्या सोबत आहोत,अशा घोषणा यावेळी दिल्या.