मुंबई : अल्लू अर्जुन हा दक्षिण मधील सुपरस्टार म्हणुन ओळखला जातो. तसेच अल्लू अर्जुनचा चाहता वर्ग खुप मोठा आहे. तर अल्लू अर्जुनचे चाहते नेहमी त्याच्या आगामी चित्रपटाची वाट पाहत असतात. अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ 5 डिसेंबरला रिलीज झाला होता आणि पहिल्याच दिवशी त्याने जवळपास डझनभर रेकॉर्ड बनवले आहेत. ‘पुष्पा 2’ हा केवळ देशातच नाही तर जगभरातील सर्वात मोठी ओपनिंग करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे.
2021 मध्ये ‘पुष्पा: द राइज’ने बॉक्स ऑफिसवरही अनेक विक्रम केले होते आणि आता ‘पुष्पा 2’ ने एक नवा इतिहास रचलेला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी देशभरात 168.30 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर प्रीमियर शोसह ही कमाई 178.40 कोटी रुपये आहे. पहिल्या दिवशी जगभरात 300 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा २’ चा ४ डिसेंबर रोजी नाईट प्रिव्ह्यू झाला आणि त्यातही विक्रम झाला. नाईट प्रिव्ह्यूजमधून 10.1 कोटी रुपयांची कमाईही जोडली तर ‘पुष्पा 2’चे कलेक्शन 178.40 कोटी रुपये झाले आहे. ‘पुष्पा 2’ ची बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती आणि आता रिलीज झाल्यानंतर त्याला मिळालेला प्रतिसाद पाहता तो बंपर ब्लॉकबस्टर ठरले आहे. ‘पुष्पा 2’ ने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. पुष्पा 2 बॉक्स ऑफिसच्या तिसऱ्या दिवशी ॲडव्हान्स बुकिंगमध्ये वाढ झाली असून त्यामध्ये 40% लोकांनी तिकीटे खरेदी केली आहेत आणि यातून 14.95 लाख इतकी रक्कम मिळाली आहे.