कोल्हापूर ( प्रतिनिधी ) – आमदार ऋतुराज संजय पाटील यांच्या संकल्पनेतून आज राजाराम तलाव येथे २ हजार झाडे लावण्याचा उपक्रम युवा पिढीच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला. एकाच ठिकाणी, एकाच वेळी ही सर्व झाडे लावण्यात आली. या रेकॉर्ड ब्रेक उपक्रमामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांसह वृक्षप्रेमी नागरिक सहकुटुंब सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित सर्वांना वृक्ष संवर्धनाची शपथ देण्यात आली.

पर्यावरण संवर्धनाबद्दल जागरूकता दाखवत सर्वांनी या माय ट्री माय कोल्हापूर उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. युवक -युवतीनी प्रचंड उत्साहात घेतलेला सहभाग कौतुकास्पद होता. यावेळी 6 ते 10 फूट उंचीची झाडे लावून त्यांना खते घालून चांगला सपोर्टही दिला आहे. या झाडांची कायमस्वरूपी निगा राखण्याची जबाबदारीसुद्धा मी घेतली आहे असं वक्त्यव्य आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी केले.

या उपक्रमात सर्व युवक युवती, माझ्या कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील प्रमुख मान्यवर, सर्व असोसिएशनचे पदाधिकारी, सहभागी झाले होते