कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : पन्हाळा येथील संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रा. राहुल उरुणकर यांना शिवाजी विद्यापीठाकडून मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विषयात पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी ‘न्यूमेरिकल इन्वेस्टीगेशन इन हिट अँड मास ट्रान्सफर इन्हान्समेंट ऑफ मेटल हायड्रॉईड हायड्रोजन स्टोरेज युसिंग नॅनोफ्युड्स’ हा शोध प्रबंध सादर केला.

हायड्रोजन स्टोरेज यासारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये संशोधन करताना त्यांनी आतापर्यंत इंटरनॅशनल जर्नल, कॉन्फरन्स आणि बुक चाप्टर असे मिळून एकूण सहा शोधनिबंध सादर केले. आर.आय.टी इस्लामपूर येथील डॉ. शरद दत्तात्रय पाटील यांनी संशोधन मार्गदर्शक म्हणून काम पाहिले. तसेच आर. आय. टी. व संजीवन महाविद्यालयातील प्राचार्य, मॅनेजमेंट व इतर सहकारी यांचे त्यांना सहकार्य लाभले. त्यांच्या या संशोधन कार्यात आई-वडील यांचे मार्गदर्शन व बहीण डॉ. तृप्ती उदय उरुणकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. हायड्रोजन सारख्या नवीनतम व काळाची गरज असलेल्या विषयावर संशोधन करून पीएचडी मिळवल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.