कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : महाराष्ट्र दिनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते जिल्ह्यात मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानाचा शुभारंभ झाला आहे. या अभियानाअंतर्गत सर्वसामान्य जनतेच्या अडचणी, तक्रारी जाणून घेवून त्यांच्या प्रश्नांची तत्परतेने सोडवणूक करुन त्यांना न्याय देण्याकरिता प्रभावी उपाययोजना म्हणून ‘नागरिकांचे समस्या समाधान अभियान’ राबविण्यात येणार आहे.

या अभियानाअंतर्गत सर्व नागरीकांनी दिनांक 21 जुलै ते 8 ऑगस्ट 2025 या कालावधीत तहसिल कार्यालय, बी.टी. कॉलेज परिसर, शाहुपूरी, कोल्हापूर येथे ‘नागरिकांसाठी समस्या, समाधान कक्ष’ स्थापन करण्यात आला असून नागरिकांनी आपल्या समस्यांचे निवारण करण्यासाठी या कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करवीरचे तहसिलदार स्वप्निल रावडे यांनी केले आहे.