पुणे : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने आज पहाटेच्या वेळी पुण्यातील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलेले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या छातीत दुखत असल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.प्रकाश आंबेडकर यांना छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल केले आहे.आंबेडकर यांच्यावर अँजिओग्राफी होणार असल्याची माहिती समजली आहे.प्रकाश आंबेडकर यांची तब्येत सध्या स्थिर आहे.

हृदयात रक्ताची गाठ असल्याने त्यांना पुण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.पुढचे 3 ते 5 दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत.पुढचे 3-5 दिवस प्रकाश आंबेडकर रूग्णालयात डॉक्टरांच्या निरिक्षणात राहणार असल्याने,वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ताई ठाकूर,निवडणूक समन्वय समिती,जाहीरनामा समिती आणि माध्यम आणि संशोधन विभागाच्या सहकार्याने पुढील काही दिवस वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत.