अमरावती (प्रतिनिधी) : सध्या विधानसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर कोणत्याही समाजविघातक पोस्ट दिसल्यास तत्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत.
तरुण वर्ग सोशल मीडिया वरती आपली मते आणि भावना व्यक्त करत असतात.सोशल मीडियावरती व्यक्त होणाऱ्या विचारांना पाठिंबा आणि विरोध ही होत असतो. त्यामुळे सायबर सेलमध्ये सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल स्थापन करून गुन्हेगारांचे स्टेटस ठेवणाऱ्यांवर बारीक नजर ठेवण्यात येणार आहे. सेलने शनिवार पर्यंत 9 जणांवर कारवाई केली आहे.
पोलीस आयुक्त नवीनचंद्र आणि उपायुक्त कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेल पोलीस ठाण्याच्या सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलच्या माध्यमातून सोशल मीडियावर होणाऱ्या हालचालींवर 24 तास लक्ष ठेवले जात आहे. समाजविघातक पोस्ट दिसल्यास तात्काळ पोलिसांचे संपर्क साधा किंवा सायबर सेल 112 डायल करा.