कोल्हापूर ( प्रतिनिधी ) – आ. पी. एन. पाटील साहेब यांचे सहकार, सामाजिक आणि राजकारणातील काम मी जवळून अनुभवले आहे. पाच वर्षे आमदार म्हणून काम करताना याचा अनुभव मला आला. राज्य तसेच देश पातळीवर निष्ठावंत काँग्रेस नेते अशी त्यांची ठळक ओळख आहे .काँग्रेस पक्षावर, काँग्रेसच्या विचारांवर त्यांची निष्ठा होती. ते आमच्यासारख्या युवा लोकप्रतिनिधीसाठी मार्गदर्शक आहेत. विधीमंडळात काम करताना ते नेहमी मार्गदर्शन करायचे. विधानभवनात लोकहिताचे प्रश्न ते अभ्यासपूर्ण व ताकदीने मांडत होते असे आमदार ऋतुराज पाटील म्हणाले.

ऋतुराज पाटील पुढे म्हणाले, कार्यकर्त्यांना त्यांच्याबद्दल प्रचंड आपुलकी होती. आ. पी.एन. पाटील साहेबांनीही कार्यकर्त्यांना नेहमीच पाठबळ दिले.
पंढरीचा पांडुरंग आणि त्याचे भक्त यांच्या प्रमाणे हे अतूट नाते होते. त्यांच्या अकाली निधनाने जिल्हा काँग्रेसचा वडिलकीच्या आधार निघून गेला आहे. असे ते म्हणाले.