बारामती : सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे.राजकीय नेते विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारीचा अर्ज दाखल करत आहे.अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांनी बारामती या मतदारसंघासाठी शरद पवार यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

बारामतीच्या निवडणुकीत युगेंद्र पवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील.युगेंद्र पवार यांचं शिक्षण परदेशात झाले आहे.तर ते एक उच्चशिक्षित पदवीधर आहेत.त्यांचं प्रशासन,व्यवसाय,साखरधंद्यात यात ते जाणकार आहे.अशा तरुणाला पक्षाने आज संधी दिली.बारामतीची जनता आज नव्या पिढीतील नव्या नेतृत्त्वाचा स्वीकार करेल.तसेच त्याच्या पाठीशी आपली शक्ती उभी करेल,याची मला खात्री आहे,अशा भावनाही शरद पवार यांनी व्यक्त केल्या आहेत.

सोबतच त्यांनी बारामतीची जनता युगेंद्र पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील,असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.यासह त्यांनी युगेंद्र पवार यांना दोन महत्त्वाचे सल्ले दिले आहेत.गेली 57 वर्षे मला लोकांनी लोकप्रतिनिधी बनन्याची संधी दिलेली आहे.माझी जनतेशी असलेली बांधिलकी हेच यामागचं कारण आहे.जनतेशी बांधिलकी ठेवा,विनम्रता ठेवा,लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जनतेने संधी दिल्यानंतर ती विनम्रतेने स्वीकारून सातत्याने जागरुक राहा,एवढाच माझा सल्ला राहील.असे शरद पवार म्हणाले.