पन्हाळा ( प्रतिनिधी )  : पन्हाळगड वरील युवा फुटबॉल खेळाडूंकडून भव्य फुटबॉल स्पर्धेचे आयोजन पहिल्यांदाच करण्यात आले. या मध्ये 6 संघांनी सहभाग नोंदवला आहे. या सामन्यांचे उद्धघाटन पन्हाळा नगरपरिषद चे मुख्याधिकारी चेतनकुमार माळी, भाजपाचे तालुका अध्यक्ष अमरसिंह भोसले, संचित भाडेकर, बाळासाहेब काशीद, युवउद्योजक साहिल पोवार, संग्राम भोसले, प्रतीक पांगे, उमर गारदी आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.

पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या भव्य फुटबॉल सामन्यांचे मान्यवरांच्या कडून कौतुक करण्यात आले. दर वर्षी अशाच प्रकारे भव्य सामने घेण्यासाठी लागेल ते सहकार्य करण्यात येईल असे सांगण्यात आले. यावेळी पन्हाळा फुटबॉल क्लबचे अध्यक्ष शुभम आडके, उपाध्यक्ष सौरभ घाडगे, सौरभ कासे, सुरज पवार, आधी फुटबॉल क्लब चे सर्व सदस्य उपस्थित होते.