टोप ( प्रतिनिधी ) टोप येथे रोड रोलर अंगावरून गेल्याने तरूण जागीच ठार झाला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना 1 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास टोप हायस्कूल परिसरात घडली आहे.
या अपघाताबाबत पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार मयताचे नाव मल्लाप्पा बसप्पा नाईक ( वय 40 रा.पाडळी खुर्द ता करवीर ) हे टोप ता हातकणंगले येथील टोप हायस्कूल परिसरात आनंदा पोवार यानी प्लॉट पाडल्याने येथे रस्त्याच्या सपाटी करणाचे काम चालू असतात रोड रोलरचे गिअर अडकल्याने रोड रोलर बंद पडला म्हणून मल्लाप्पा नाईक हे खाली उतरून रोड रोलरच्या इंजिनचे डोअर खोलून काय बिघाड झालाय हे पाहत होते.
दरम्यान अचानक रोड रोलर सुरू होऊन पुढे जात असताना नाईक यानी रोलर थांबविण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना अपयश आलं व ते रोलरच्या खाली आले व त्यांच्या अंगावरून जात पुढे असणार्या झाडाला जाऊन थांबला यात नाईक हे जागीच ठार झाले या अपघाताची नोंद शिरोली पोलिसात रात्री उशिरा झाली आहे.