मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा खिलाडी म्हणून ओळखला जातो. अक्षय कुमार हा आपल्या आगळ्या वेगळ्या चित्रपटांबद्दल माहिती देत असतो. सध्या मुंबईमध्ये ‘हाऊसफुल 5’ चे शूटिंग चालु आहे. तर या चित्रपटासाठी स्टंट करत असताना अभिनेत्याचा अपघात झाला आहे. तर या अपघातात अभिनेत्याच्या डोळ्याला दुखापत झालेली आहे. आता अभिनेत्याच्या तब्येतीबद्दल माहिती समोर आली आहे. तर आता अभिनेता बरा असल्याचे सांगितले जात आहे.
हाऊसफुलच्या सेटवर शूटिंग करताना स्टंट करताना अक्षयच्या डोळ्यात काहीतरी उडून गेले. एका नेत्ररोग तज्ज्ञाला लगेच सेटवर बोलावण्यात आले, त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली आणि त्याला काही वेळ विश्रांती घेण्यास सांगितले आहे, तर इतर कलाकारांसोबत शूटिंग पुन्हा सुरू झाले आहे. तर दुखापत झाली असुन अक्षयने चित्रपटाचे शूटिंग अंतिम टप्प्यात असल्याने लवकरच शूटिंगमध्ये सहभागी होण्याचा निर्धार केला आहे आणि त्याला उशीर होऊ नये अशी त्याची इच्छा त्याने व्यक्त केली आहे.
हाऊसफुल 5 मध्ये फ्रँचायझीचे अक्षय आणि रितेश देशमुख तसेच अभिषेक बच्चन, श्रेयस तळपदे, चंकी पांडे, जॅकलीन फर्नांडिस आणि नर्गिस फाखरी यांच्या पुनरागमनासह उत्कृष्ट कलाकारांचा समावेश यामध्ये आहे. हे सगळे कलाकार प्रेक्षकांचं दुप्पट मनोरंजन करणार आहेत. हा चित्रपट या वर्षाच्या सुरुवातीला चित्रपटाच्या शूटिंगला युरोपमध्ये सुरुवात झाली होती. या कलाकारांनी क्रूझ जहाजावर 40 दिवसांसाठी चित्रपट शूट केला आहे. ‘हाऊसफुल 5’ हा कॉमेडी चित्रपट 6 जून 2025 रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक झाले आहेत.