कोल्हापूर – शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या ( 27 जुलै ) रोजी वाढदिवस आहे. राज्यात उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस शिवसैनिक दरवर्षी उत्साहात साजरा करतात. दरवर्षी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिम्मित राज्यभरातून शिवसैनिक नवनवीन उपक्रम नागरिकांसाठी राबवत असतात . अशातच हुपरी येथे हातकणंगले विधान सभा मतदार संघ व अथायू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ( कोल्हापूर ) यांच्या वतीने नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर हुपरी येथील चांदी कारखाना असोसिएशन हॉल येथे उद्या 11 ते 12 या वेळेत हे आयोजित करण्यात आले आहे.

या आरोग्य शिबिरामध्ये ऑजियोग्राफी, हृदयविकार, मुतखडा व प्रोटेस्ट सोनोग्राफी, हाडांचे विकार तपासणी, व ऑपरेशन केले जाणार आहे. तसेच महात्मा फुले जनआरोग्य अंतर्गत पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना हे शिबीर मोफत असणार आहे. शिबिरामध्ये ज्या रुग्णांना ऑपरेशन सांगितले आहे., अशा रुग्णांसाठी हॉस्पिटलकडून मोफत बस सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. शिबिरात येताना नागिरीकांनी ओरिजनल रेशन कार्ड व आधार कार्ड घेऊन यावी असे आवाहन हातकणंगले विधान सभा मतदार संघाच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.