कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५१व्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने आज (शुक्रवार) वरुणतिर्थवेस इथल्या गांधी मैदान येथील महात्मा गांधी यांच्या पुतळयाला महापौर निलोफर आजरेकर, आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती सचिन पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी नगरसेवक अशोक जाधव, आरोग्याधिकारी डॉ.अशोक पोळ, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, उपशहर अभियंत एन एस पाटील, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबंरे, चंद्रकांत यादव, नागरिक उपस्थित होते.