कोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्या प्रत्येकजण फिटनेस आणि डायट चार्ट फॉलो करत असतात. यामध्ये प्रोटीन कसे मिळवायचे ..? कोणत्या पदार्थांतून मिळवायचे म्हटलं की, चिकन आणि अंडी या मांसाहारी पदार्थांची नावे समोर येत असतात. यामध्ये मात्र, शाहाकारी असणाऱ्या लोकांची पंचायत होते.

शाकाहारी असणाऱ्या लोकांना प्रोटीन मिळवण्यासाठी योग्य पर्याय म्हणजे ‘मूग डाळ’ . मूग डाळीमध्ये प्रोटीनसोबत अनेक महत्त्वाची पोषक तत्त्वे असतात जी आरोग्यासाठी उपयुक्त असतात. 100 ग्रॅम मूग डाळीमध्ये 8 ग्रॅम प्रोटीन असते. त्यामुळे, शाकाहारी लोकांनी नियमितपणे मूग डाळीचे सेवन केल्यास त्यांना नक्कीच फायदा होणार आहे.

मूगडाळमधील प्रोटीनचे काही प्रमुख फायदे –

  • वजन व्यवस्थापन: मूगडाळीमध्ये प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात असल्याने अनावश्यक खाद्यपदार्थ खाण्याची इच्छा कमी करतात. त्यामुळे वजन कमी करण्यास आणि व्यवस्थापित करण्यासाठी मूगडाळ मदत करू शकते.
  • स्नायूंची वाढ: प्रोटीन हा स्नायूंच्या वाढीसाठी आवश्यक असतो. शारीरिक व्यायाम करणाऱ्या व्यक्तींसाठी मूगडाळ एक उत्तम प्रोटीन स्रोत आहे.
  • चयापचय वाढ: मूगडाळमध्ये असणारे प्रोटीन आपल्या शरीराच्या चयापचयाला चालना देण्यास मदत करते. चयापचय वाढल्याने आपले शरीर अधिक कॅलरीज जाळते आणि वजन कमी करण्यात मदत होते.
  • रोगप्रतिकारक शक्ती वाढ: प्रोटीन आपल्या शरीरातील पेशींना मजबूत करण्यास मदत करते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
  • हृदय आरोग्य: मूगडाळमधील प्रोटीन आणि फायबर हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. ते रक्तदाब नियंत्रित ठेवण्यात आणि खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यात मदत करू शकते.
  • पाचन सुधार: मूगडाळमधील फायबर पचनक्रिया सुधारते आणि कब्ज आणि इतर पाचन समस्या टाळण्यास मदत करते.

मूगडाळीचे हे पदार्थ करून खाऊ शकता..?

मूगडाळची खिचडी
मूगडाळची आमटी
मूगडाळचे वरण
मूगडाळचे ढोकळे
मूगडाळचे चिला
मूगडाळीचे पेरणे
सॅलडमध्ये मूगडाळ