मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका लढवण्यात आल्या होत्या. त्या निवडणुकीत महायुतीच्या तिन्ही पक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जोरदार कामगिरी केली. भाजपने १३२ जागा जिंकल्या तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांची संख्या ४० वरुन ५७ वर नेली. महायुतीला २३० आमदार मिळाले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा विश्वास वाढला आहे. त्यांनी आता मुंबई महानगरपालिकेची तयारी सुरु केली आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार खासदार यांच्या सोबत महत्वाची बैठक घेतली
काय म्हणाले एकनाथ शिंदे..?
मुंबई आर्थिक राजधानी आहे. पण मुंबई देशाचं पवार हाऊस झालं पाहिजे, त्यासाठी मुंबई पालिकेत सुद्धा महायुतीचेच सरकार असणं आवश्यक असल्याचे मत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केले. त्या तयारीसाठी नगरसेवक, आमदार, खासदार यांची बैठक घेऊन चर्चा करण्यात आल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी बैठक घेतल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.
मुंबईच्या विकास हा आमचा अजेंडा
मुंबईच्या विकास हा आमचा अजेंडा आहे. मुंबईतील खड्ड्यांचा प्रवास टाळण्यासाठी दोन फेजमध्ये आम्ही निर्णय घेतले. यामध्ये मेट्रोची, कोस्टल, अटल सेतू ही काम लोक पाहत आहेत. सुरक्षित मुंबई महिलांना द्यायची आहे. त्यासाठी ही निवडणूक लढवायची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सांगितलं आहे की, मुंबईला आर्थिक कमतरता भासणार नाही असे एकनाथ शिंदे म्हणाले. ते लोक लोकसभेच्या निवडणूक झाल्या की हुरळून गेले, त्यांनी विधानसभेचे मंत्रीमंडळ सुद्धा तयार केलं होतं असा टोला एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.