मुंबई : सध्या सर्व महिलांचे लक्ष लागून राहिले आहे ते म्हणाजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण याकडे..! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे कधी खात्यावर पुन्हा जमा होतील याकडे सर्व राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. एकंदरीत या विधासभेला महायुती सरकारला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा फायदा झाला आहे. ही योजना ही विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी गेमचेंजर ठरली. विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला आणि २३७ जागांवर आमदार निवडून आलेत. या विजयामध्ये लाडक्या बहिणींचा सिंहाचा वाटा असल्याचे महायुतीच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. अशातच भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी मागणी केली आहे.
काय म्हणाले नितेश म्हणाले..?
नितेश राणे यांनी मुस्लिम कुटुंबात जर दोन पेक्षा जास्त मुलं असतील तर त्यांना लाडकी बहीण योजनेतून बाद करा असं वक्तव्य केलं आणि एकच खळबळ उडाली. नितेश राणे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. आणि विनंती करणार आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत बदल करावा. या योजनेतून आदिवासी बांधवांना सूट द्या आणि २ अपत्य असणाऱ्यांनाच या योजनेचा लाभ द्या असे निकष या योजनेत टाका, असे वक्तव्य नितेश राणे यांनी केलं आहे.
पुढे ते असेही म्हटले की, हा फक्त ट्रेलर आहे जेव्हा हिंदू समाज पूर्ण पिक्चर दाखवेल तेव्हा तुम्हाला तुमचा अब्बा आठवेल, असं म्हणत नितेश राणेंनी एका विशिष्ट समाजावर निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. तर नितेश राणे यांनी केलेल्या मागणीनंतर यासंदर्भात सरकार निर्णय घेईल, असे म्हणत शिंदेंचे खासदार नरेश म्हस्के आणि भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे.