मुंबई : निक्की तांबोळीने बिग बॉसच्या घरात टास्क पार केल्यानंतर आता ती बिग बॉसच्या ग्रैंड फिनालेची पहिली सदस्य बनली आहे तर तिला पहिलं तिकिट मिळालं आहे.त्यामुळे बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनच्या ग्रँड फिनालेमध्ये एन्ट्री मिळवणारी निक्की ही पहिली सदस्य आहे.ग्रॅड फिनालेचं तिकीट मिळवण्यासाठी निक्की आणि सूरजमध्ये टास्क दिला होता.तर यावेळी निक्कीने बाजी मारत तिकीट मिळवलं.
बिग बॉसच्या घरात पहिल्या आठवड्यापासून निक्कीने गोंधळ घातला आहे.निक्कीने बिग बॉस 5 चा हा सिजन गाजवून सोडला आहे.तर निक्कीच्या वागण्यावरही प्रेक्षकांमधून संताप व्यक्त केला जातो.त्याचप्रमाणे निक्कीला घराबाहेर काढा अशी मागणी सारखी होत असते.पण आता निक्कीला बिग बॉसच्या ग्रैंड फिनालेचं पहिलं तिकीट मिळाले आहे.गार्डन एरियामध्ये लोखंडाच्या पाईपचे एक चक्रव्युह ठेवण्यात आले होते आणि त्याच चक्रव्युहात एक रिंग अडकवण्यात आली होती.या टास्कमध्ये म्युचअल फंडमध्ये जास्त रक्कम असल्यामुळे निक्की तिकीट टू फिनालेची थेट उमेदवार झाली आहे.