मुंबई : कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी एमआयडीसीच्या नावाखाली स्थानिक शेतकऱ्यांना डावलून बाहेरून आलेल्या आणि भारताला करोडो रुपयांना फसवलेला उद्योगपती आणि व्यापाऱ्यांना फायदा व्हावा म्हणून घाट घालत भूखंड घशात घालण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
तरुणांना रोजगार उपलब्ध होण्याकरिता एमआयडीसी व्हावी की काही ठराविक उद्योगपतींना आणि व्यापाऱ्यांना त्याचा फायदा मिळवून देण्यासाठी रोहित पवार यांनी एकाच गावात एमआयडीसी करण्याचा अट्टाहास सुरू केला आहे. एकाच ठिकाणी एमआयडीसी होण्याचा इतका आग्रह रोहित पवार यांचा का होता याचा अभ्यास केल्यानंतर फार मोठा भूखंड घोटाळा इथे उदयाला येत असल्याचे लक्षात आल्याचे उमेश पाटील म्हणाले.
ज्या कर्जत – जामखेडच्या पाटेगाव व खंडाळा येथील ४५८ हेक्टर म्हणजे जवळपास १२०० एकर क्षेत्र संपादित केले जाणार आहे. त्याठिकाणी मूळ जमीनदार, शेतकरी आहेत. काही जमीनी द्यायला तयार आहेत तर काही गावे जमीनी देण्यास विरोध करत आहेत. या गावातील जमीनींपेक्षा इतर गावात जी जागा आहे ती उपजत जागा आहे ती वापरली जाऊ नये असा लोकांचा आग्रह आहे. मात्र रोहित पवार यांचा त्याच जागेवर एमआयडीसी झाली पाहिजे हा आग्रह का आहे तर मुळ शेतकऱ्यांकडून कवडीमोल दराने जागा घेतलेल्या उद्योगपतींना भरमसाठ मोबदला मिळावा यासाठी असल्याचा थेट हल्लाबोलही उमेश पाटील यांनी केला.
यावेळी उमेश पाटील यांनी पाटेगाव, खंडाळा गावात ज्यांनी जागा घेतलेल्या त्यामध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हेगार नीरव मोदी याची सहा ते सात ठिकाणी जमीन आहे.याशिवाय महाजन, अग्रवाल, पोद्दार, छेडा, खन्ना, जैन, शेट्टी, मेहता यांना मोबदला मिळवून देण्यासाठी लोकांनी रोहित पवार यांना निवडून दिले आहे का असा सवालही उमेश पाटील यांनी केला.
संपादीत जमीनीमध्ये कवडीमोल दराने जमीनी खरेदी करता येत नाही हे रोहित पवार यांना चांगले माहित आहे. मात्र तरीही सन २०२१-२२ मध्ये जमीनी खरेदी केलेल्या आहेत. रोहित पवार यांना तरुणांच्या रोजगाराचा एवढा कळवळा आहे तर स्थानिक लोकांचा विरोध असताना रोहित पवार यांचा त्याच जागेवर एमआयडीसीचा आग्रह का आहे हा खरा चेहरा जनतेसमोर आता यायला लागला आहे असेही उमेश पाटील म्हणाले.
एमआयडीसी प्रस्तावित झाल्यावर जमीनी खरेदी झाल्यात अशा नाही त्याअगोदरही झाल्या आहेत, परंतु जे तिथले खातेदार आहेत, मुळ शेतकरी आहेत, त्यांना मोबदला न मिळता उद्योगपतींना, व्यापाऱ्यांना, आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराला पैसे मिळवून देण्यासाठी, बेरोजगार तरुणांच्या नावाखाली एक खोटं चित्र उभे करत आहे ते कर्जत – जामखेड नव्हे तर महाराष्ट्रातील जनतेला आमदार रोहित पवार हा किती फ्रॉड आहे आणि त्यांचा दाखवायचा चेहरा आणि खरा चेहरा आता समोर आणला आहे. त्यामुळे या प्रकरणाची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी एसआयटीमार्फत चौकशी करावी अशी मागणीही उमेश पाटील यांनी केली.
महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन ‘या’ दिवशी होणार सुरू
by
Adeditor18
December 12, 2024
अन् पैश्यांच्या जोरावर लोकशाही..; नाना पटोले
by
Adeditor18
December 12, 2024
‘हा’अभिनेता एका चित्रपटासाठी घेतो 250-300 कोटी
by
Adeditor18
December 12, 2024