मुंबई : भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानमधून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे”हमारे पास तुम्हारी पुरी जानकारी है, हिंदू शेरनी तू कुछ दिन की मेहमान है, तुझे खत्म कर देंगे, ना सिंदूर बचेगा ना सिंदूर लगाने वाली बचेंगी”, अशा पद्धतीच्या नवनीत राणा यांना धमक्या आल्या आहे. नवनीत राणा यांनी यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार केली असून, पोलिसांनी धमक्या नेमक्या कोठून येत आहेत, याचा शोध सुरू केला आहे.

भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्या नवनीत राणांंनी पाकिस्तानवर हल्लाबोल केला होती. त्याचवेळी नवनीत राणा यांना पाकिस्तानमधून धमकीचा कॉल आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपासही सुरु केला आहे. नवनीत राणा यांना आलेली ही धमकी आंतरराष्ट्रीय पातळीवरुन आली आहे