निपाणी ( प्रतिनिधी ) – निपाणी तालुक्यातील यमगर्णी ग्राम पंचायतीच्या व्याप्ती मध्ये येणाऱ्या नांगनूर या गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समुदाय भवन समोरील बाजूस मोठया प्रमाणात गवत व झाडे जुडपे वाढलेली असून समुदाय प्रवेश द्वारा जवळच मोठे बगदाड पडून अनेक दुर्घटना होत आहेत.

गावात दुकानातील सामान खरेदीसाठी व शाळेतील लहान मुले येथून जात असतात. पावसामध्ये या मध्ये पाणी साठून राहिल्याने मोठया प्रमाणात लहान मुले तसेंच वाहने यामध्ये आढखून पडली आहेत. तसेंच गावातील अनेक ठिकाणी गटारीतील सांड पाण्याचे निचरा न झाल्यामुळे गटारी तुंबून राहून दुर्गंधी व रोग- राहीचे प्रमाण वाढले आहे तरीही ग्रामपंचायत याकडे लक्ष देत नाही.

कित्येकदा नागरिकांनी या समस्या ग्रामपंचायतीला सांगूनही, ग्रामपंचायत अधिकारी याकडे दुर्लक्ष करत करत आहे. मोठी दुर्घटना झाल्यावरचं ग्रामपंचायत याकडे लक्ष देणार का असा प्रश्न नागरिकांनाकडून होत आहे. तरीही या समस्ये कडे अधिकारी वर्ग व ग्राम पंचायत सदस्यांनी लक्ष घालून लवकरात लवकर या समस्या मार्गी लावाव्या, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.