टोप (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील राजनंदिनी स्टोन क्रशरचे उद्योजक नंदकुमार यांना बेळगावच्या नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशनचा इंटरग्रेटेड सोशल वेल्फेअर सोसायटीच्यावतीने राष्ट्रीय आदर्श उद्योगरत्न देण्यात आला आहे. हा पुरस्कार सोहळा गोवा येथे काल (रविवार) माजी केंद्रीय मंत्री विरप्पा मोईली यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

नंदकुमार मिरजकर आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव आबिद मुश्रीफ यांची राजनंदिनी स्टोन क्रशर ही भागिदारीमध्ये फर्म आहे. गेल्या १० वर्षांपासून या फर्मच्या माध्यमातून सर्व शासकीय कामासाठी, विमानतळ अशा बऱ्याच ठिकाणी क्रशर, खडी, क्रश सॅन्ड देण्याचे काम केले आहे. पश्चिम महाराष्ट्रील कृत्रिम वाळू तयार करण्याचे पहिले काम राजनंदिनी स्टोन क्रशरने केले आहे.

बांधकाम क्षेत्रात नदीमधील वाळू बंद असल्याने कृत्रिम वाळू तयार करून ती बांधकाम बाजारात आणण्याच काम नंदकुमार मिरजकर यांनी केले आहे. या सर्व कामांची दखल घेऊन बेळगावच्या नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या आणि इंटरग्रेटेड सोशल वेल्फेअर सोसायटीच्यावतीने मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन राष्ट्रीय आदर्श उद्योगरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

या पुरस्काराच्या वितरणावेळी माजी केंद्रीय मंत्री विरप्पा मोईली, माजी आमदार अमरसिंह पाटील, शिवम भोसले आदी उपस्थित होते.