कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्लास्टिक पिशव्या बंदी आदेशानुसार आज (मंगळवार) महापालिकेच्या पथकाने लक्ष्मीपुरी परिसरातील अमृत प्लास्टिक आणि मनिष अहुजा या दुकानांवर प्लास्टिक पिशव्या वापरल्याबद्दल प्रत्येकी ५ हजार रुपये दंडाची कारवाई केली आहे. शासनाच्या आदेशानुसार प्लास्टिक पिशव्या वापरावर बंदी असतानाही काही व्यापारी, व्यावसायिक प्लास्टिक पिशव्यांचा वापर करीत आहेत. त्यांच्यावरही महापालिका पथकामार्फत धडक मोहिम सुरु केली आहे. ही कारवाई विभागीय आरोग्य निरिक्षक निखिल पाडळकर, राहूल राजगोळकर, मुकादम हेमंत कुरणे आणि विशाल कांबळे यांनी केली आहे.

आरोग्य विभागाची ५ पथके कार्यरत

प्लास्टिकचा वापर करणे गुन्हा असून प्लास्टिकचा वापर रोखण्यासाठी महापालिकेने ५ पथके तैनात केली असून शहरात प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांविरोधात धडक मोहिम सुरु केली आहे.