कोल्हापूर (प्रतिनिधी) : अतिवृष्टीमुळे शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. प्रशासन रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांकडे दुर्लक्ष करत करत आहे काय ? असा सवाल करत नागरिकांच्या जीवाशी खेळाल तर याद राखा असा सज्जड इशारा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी काल महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिला होता. या न नंतर महानगरपालिका प्रशासन तात्काळ अॅक्शन मोडवर आली असून शहरातील खड्डे मुजविण्यास तातडीने सुरवात केली आहे.

गेल्या चार दिवसांपूर्वी एका लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या बैठकीत ३० ऑगस्ट पर्यंतची वेळ प्रशासनाने दिली होती. पण, खड्डेमुक्त शहर ही प्रशासनाची जबाबदारी असून, लोकांचे जीव जाण्याची वाट पाहू नका असा इशारा देत दोन दिवसांचा अल्टिमेटम ही क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांना दिला होता.

क्षीरसागर यांच्या सुचनेप्रमाणे ज्या ठिकाणी चिखल, दलदलीची परस्थिती आहे त्या ठिकाणी मुरूमाद्वारे खड्डे बुजविण्यात येत असून, शक्य असेल त्या सर्व ठिकाणी सिमेंट व डांबरीकरणाचे पॅचवर्क करण्यात येणार आहे.