कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : अनेकवेळी आपल्या कामाच्या घाईत आपण नाश्ता करणे विसरतो किंवा वगळतो. पण आरोग्य तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे विविध आजार टाळण्यासाठी आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी सकाळचा नाश्ता खूप महत्त्वाचा आहे. नाश्ता न करणे शरीराला हानिकारक ठरू शकते.

तुमच्या शरीराला सकाळी पोषण मिळत नसेल तर तुम्ही अशक्तपणाचे शिकार होऊ शकता. कारण सकाळचा नाश्ता न करणे किंवा त्याची सवय न केल्याने शरीरात अनेक पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते आणि त्यामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात. नाश्ता वगळल्याने मधुमेहासारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. शरीरात अनेक पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते. सकाळचा नाश्ता न केल्याने जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारख्या घटकांची कमतरता होऊ शकते. तुमचे वजन वाढू शकते किंवा कमीही होऊ शकते. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ लागते. कोर्टिसोल हार्मोनची पातळी वाढते. सकाळी नाश्ता न केल्याने शरीरातील चयापचय क्रिया मंदावते ज्यामुळे अनेक आजार आणि समस्यांना तुम्ही बळी पडता. त्यामुळे आपले आरोग्य जपण्यासाठी सकाळचा नाश्ता हा खुप महत्त्वाचा असतो.