मुंबई (प्रतिनिधी) : महायुतीच्या मंत्रीमंडळाचा विस्तार उद्या नागपुरातील राजभवनात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेते पक्षश्रेष्ठींच्या भेटीला येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर अनेक राजकीय नेते भेट घेण्यासाठी येत आहेत. अशातच आता, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील देखील सागर बंगल्यावर दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

मात्र, मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी आ. राजू पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर भेटीला दाखल झाले होते. आ. राजू पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना मुलाच्या लग्नाचे आमंत्रण दिले.

महाराष्ट्र विधानसभेच हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये 16 डिसेंबरपासून सुरु होत आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होत आहे. तरी इच्छुक उमेदवार वर्षा आणि सागर बंगल्यावर भेट घेण्यासाठी दाखल होत आहेत. उद्या नागपुरातील राजभवनात 4 वाजता मंत्री मंडळाचा विस्तार होणार आहे. यामध्ये काही मंत्रीपदे भाजप आणि शिवसेना रिक्त ठेवणार असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. कारण, मंत्रीपदासाठी इच्छुक असणाऱ्यांची संख्या जास्त आहे.