मुंबई : लोकसभा निवडणुकीमुळे विधान परिषदेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. राज्यात 4 जागांसाठी विधानपरिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी उद्धव ठाकरे गटकडून दोन नावांची घोषणा करण्यात आली आहे. यानंतर भाजप आणि शिंदे गटकडूनही उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे. भाजपाकडून आता पुन्हा निरंजन डावखरे यांना संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. तर शिंदे गटाकडून एक नाव चर्चेत आहे.

राज्यात मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदार संघासाठी विधान परिषदेची निवडणूक होत आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी अनिल परब आणि ज. मो. अभ्यंकर यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपकडून पुन्हा निरंजन डावखरे यांना संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. तर शिंदे गटाकडून दीपक सावंत यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा आहे.

सयांना उमेदवारीची शक्यता
विधान परिषदेच्या रिक्त जागांवर 26 जून रोजी मतदार होणार आहे. 4 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत कोकण पदवीधर मतदार संघ, मुंबई पदवीधर मतदारसंघ आणि नाशिक पदवीधर मतदार संघासह नाशिक शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे.

भारतीय जनता पक्षाने कोकण पदवीधर मतदारसंघातून पुन्हा एका विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांना संधी देण्याची शक्यता आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मुंबई पदवीधर मतदारसंघातून दीपत सावंत यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने अनिल परब आणि ज. मो. अभ्यंकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.