कोल्हापूर ( प्रतिनिधी ) नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग रस्ता विरोधासाठी आज कोल्हापूरमध्ये आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विराठ मोर्चा काढण्यात आला आहे. मोर्चामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोर्चाला संबोधित करताना आमदार सतेज पाटील म्हणाले की, यांनी हा मार्ग निव्वळ ठेकेदारांच्या हितासाठी केला जात आहे. यात कोणत्याही शेतकऱ्याचे हित नसल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी हा लढा शेवटपर्यंत लढला पाहिजे ज्याच्यात तांत्रिक बाबी आणि न्यायालयीन बाबींचाही विचार केला पाहिजे. त्याशिवाय ही लढाई लढता येणार नाही असाही मुद्दा त्यांनी नमूद केला. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी याबाबत हरकती नोंदल्या पाहिजेत कारण या हरकतीस उद्या महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे ते म्हणाले.

येत्या 12 तारखेपर्यंत राज्य सरकारने हा मार्ग रद्द करण्याची घोषणा करण्याचा ठोस निर्णय घ्यावा अन्यथा, रस्त्यावर उतरून ही लढाई आम्ही लढू आणि ती लढाई निर्णायक असेल तसेच ही लढाई राज्य शासनाला परवडणारी नसेल इतकी जोराची धग कोल्हापुरातून उठेल असाही आक्रमक पवित्रा सतेज पाटील यांनी घेतला.

कॉन्ट्रॅक्टरांना हाताशी धरल्याने यात मोठा स्कॅम..!

ज्या कॉन्ट्रॅक्टर ना यात कॉन्टॅक्ट मिळालेले ते कॉन्टॅक्टरांना काही दिवसांपूर्वी भाजपला इलेक्ट्रॉनच्या माध्यमातून पैसे दिलेले आहेत आणि त्याच कॉन्ट्रॅक्टरना या महामार्गासाठी राज्य शासनाने जवळ केला आहे त्यामुळे हा मार्ग म्हणजे मोठा स्कॅम आहे आणि यापासून आपण सावध राहायला पाहिजे असा थेट आरोप सतेज पाटील यांनी यावेळी केला.